तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांचे प्रत्येक सभेतील ठरलेले पाच डायलॉग
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जवळपास दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आहेत. मात्र भुजबळांविषयी सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल होत असतात. याचं कारणही तसंच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सभा घेतल्या, ज्यामध्ये त्यांनी त्याच-त्याच वाक्यांचा पुनरुच्चार केला आणि सोशल मीडियावर भुजबळांविषयी विनोद व्हायरल व्हायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी सभा […]
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जवळपास दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आहेत. मात्र भुजबळांविषयी सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल होत असतात. याचं कारणही तसंच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सभा घेतल्या, ज्यामध्ये त्यांनी त्याच-त्याच वाक्यांचा पुनरुच्चार केला आणि सोशल मीडियावर भुजबळांविषयी विनोद व्हायरल व्हायला लागले.राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. यामध्ये भुजबळांची जवळपास प्रत्येक सभेला उपस्थिती होती. या सभांमधले त्यांचे वाक्य तर गाजलेच, शिवाय सध्या सुरु असलेल्या सभांमध्येही त्यांचे काही डायलॉग व्हायरल होत आहेत.1. “महाराष्ट्र सदन सुंदर, बनाने वाला अंदर”2. “चहा विकण्याच्या थापा मारणाऱ्या मोदींनी देश विकू नये एवढीच अपेक्षा”3. “सगळं अटॅच केलं, लोकांचं प्रेम अटॅच नाही करु शकले”4. “कपडे सोडून सगळं काही जप्त केलं”5. “तुरुंगात का टाकलं हे मला आणि ज्यांनी टाकलं त्यांनाही अजून माहित नाही”