निदा खानला लपवणं मतीन पटेलांना पडलं महागात, महापालिकेचा दणका, नक्की काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरासह निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर महानगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. कायदेशीर नोटीस आणि न्यायालयाच्या निकालानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली

| Updated on: May 13, 2026 | 9:44 AM
1 / 8
नाशिकमधील प्रसिद्ध आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

2 / 8
छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळपासूनच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मोठी कारवाई हाती घेतली आहे. एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांनी केलेले अनधिकृत आणि विनापरवाना बांधकाम पाडण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.

3 / 8
विशेष म्हणजे, ज्या घरात निदा खानला आश्रय देण्यात आला होता, ते घरदेखील जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेने मतीन पटेल यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४७८ (२) अन्वये २४ तासांची अंतिम नोटीस बजावली होती.

4 / 8
यापूर्वी दिलेल्या नोटिशीला पटेल यांनी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयानेही या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आज पहाटेपासूनच महापालिकेचे पथक नारेगाव परिसरात दाखल झाले.

5 / 8
मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १५० हून अधिक मनपा कर्मचारी आणि अधिकारी, १० जेसिबी, २ पोकलेनद्वारे ही कारवाई करण्यात आली. तसेच १२९ पोलीस अधिकारी व कर्मचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तैनात होते.

6 / 8
मतीन पटेल यांचे निवासस्थान, कार्यालय आणि ६ इतर आस्थापनांसह एकूण ३ मुख्य जागांवर कारवाई केली जात आहे. ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका अन्य प्रॉपर्टीवरही कारवाई केली जाणार आहे.

7 / 8
कारवाई सुरू असताना एक विचित्र आणि लक्षवेधी चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण हटाव पथकाचे स्वागत फुलांची उधळण करून आणि उपायुक्तांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन केले.

8 / 8
नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई सुरू असतानाच ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, ते घरदेखील महापालिकेकडून पाडण्यात आले. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही कारवाई करत आहोत. ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या प्रत्येक अनधिकृत बांधकामावर, मग ते कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असोत, अशीच कडक कारवाई केली जाईल, असे छत्रपती संभाजीनगरचे मनपा उपायुक्त संतोष वाहूळे म्हणाले. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us