
झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेतील राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते... अनिता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते.

अभिनेत्री अनिता दातेने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या साडीतील खास फोटोंवर नेटकऱ्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हीच का ती 'माझ्या नवऱ्याची बायको'मधली राधिका?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका मी न चुकता बघत होतो, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय.

तर खूपच सुंदर दिसतेस. मी तुझा खूप मोठा फॅन आहे. तुला एकदा भेटायची इच्छा आहे, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तू जितकी साधी आहेस, तितकीच स्टायलिश आहेस, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका हे अनिताचं पात्र गाजलं. शिवाय मी वसंतराव या सिनेमात काम केलं आहे. तर आता ही कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेत दिसतेय.