‘ती गर्लफ्रेंड आता कुठंय?’ राहुल गांधी यांचं उत्तर व्हायरल, सांगितला तो जुना किस्सा
Rahul Gandhi on Rumoured Girlfriend: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राची देशातच नाही तर परदेशातही सध्या जोरदार चर्चा आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक खास प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हटके अंदाजात उत्तर दिले. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Rahul Gandhi on Rumoured Girlfriend: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा, रील्स, व्हिडिओ आपण नेहमी पाहतो. त्यात विविध दावे केले जातात. त्यात त्यांच्या गर्लफ्रेंडविषयीचा सर्वात मोठा दावा करण्यात येतो. काँग्रेस नेत्या सोनिया यांच्या बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राहुल गांधी यांनी त्या कथित गर्लफ्रेंडविषयी मोठा खुलासा केला आहे. या कार्यक्रम सोहळ्यातून बाहेर पडताना त्यांना, ‘ती गर्लफ्रेंड आता कुठंय?’ असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी असं मिश्कील उत्तर दिलं.
‘ती गर्लफ्रेंड आता कुठंय?’
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट ब्रिटनमधील केंब्रिज येतील वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली. या आठवणींना राहुल गांधी यांनी उजाळा दिला. अनेक वर्षानंतर आपण देखील आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याच रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांना विचारले की, ‘ती गर्लफ्रेंड आता कुठंय?’ या प्रश्नावर राहुल गांधी यांनी स्मितहास्य केले. “ती गर्लफ्रेंड आता माझी चांगली मैत्रीण आहे,” असं उत्तर त्यांनी दिलं. त्यांनी माध्यमांशी या विषयावर हलकाफुलका संवाद साधला.
भाषणादरम्यान राहुल गांधी भावुक
आईच्या आत्मकथा पुस्तकाच्या कार्यक्रमात राहुल गांधी भावुक दिसले. त्यांनी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटुंबावर कोसळलेल्या संकटांची आठवण काढली. सोनिया गांधी यांची स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण आहे. परंतु वडिलांच्या निधना वेळच्या घटना त्या विसरल्या आहेत. वडिलांच्या जाण्यानंतर हसणारी आणि आनंदी राहणारी आई कुठंतरी हरवली आणि त्यांचा एक नवीन प्रवास सुरू झाला, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
आत्मचरित्र का लिहिलं?
सोनिया गांधी यांनी आत्मचरित्र का लिहिलं, याविषयीची माहिती दिली. गांधी कुटुंबियांबद्दल, पती आणि मुलांबाबत समाजात अनेक चुकीच्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या जातात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची खरी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.
