
‘माझा होशील ना’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.

ती नेहमीच नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र आता तिनं हटके फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत.

सुंदर ड्रेस, गळ्यात मोत्याची माळ आणि डोक्यावर छान कॅप एकूणच गौतमीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे.