AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | सलमानच्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता ‘जेठालाल’ बनून घराघरांत पोहचलेत दिलीप जोशी!

बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्‍याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: May 26, 2021 | 11:00 AM
Share
बॉलिवूड आणि टीव्ही जगताचा सुप्रसिद्ध चेहरा दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी आपल्या धमाल कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ते बर्‍याच टीव्ही मालिकांचा एक भाग देखील होते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील ‘जेठालाल’ या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनेते दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला होता. आज (26 मे) दिलीप जोशी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 8
अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात बरेच संघर्ष पाहिले. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्येही छोट्या छोट्या भूमिका ककेल्या. मोठमोठ्या चित्रपटांत काम करूनही त्यांना विशेष नाव मिळू शकले नाही. पण ‘जेठालाल’ने कधीच आशा सोडली नाही. ते थिएटरमध्ये काम करू लागले.

2 / 8
2008 मध्ये दिलीप जोशी यांचे मित्र असित कुमार मोदी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बनवत होते. यापूर्वी दोघांनीही एकत्र काम केले होते. अशा परिस्थितीत असित मोदींनी दिलीप जोशी यांना ‘चंपकलाल’च्या भूमिकेची ऑफर दिली.

3 / 8
तथापि, त्यावेळी असित मोदींना वाटले की, दिलीप ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकणार नाही. यावर त्यांनी दिलीपशी मनमोकळेपणाने बोलणे केले आणि म्हटले की, कदाचित वयोवृद्ध माणसाची भूमिका तुला नीट साकारता येणार नाही. पण ते चंपकलालच्या मुलाची म्हणजेच ‘जेठालाल’ची भूमिका करू शकतात.

4 / 8
अशाप्रकारे दिलीप जोशी यांना या मालिकेतलं एक असं पात्र मिळालं, ज्यासाठी ते आजही ओळखले जातात आणि या पात्राने त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळवून दिले आहेत. मालिकेत आजही ‘जेठालाल’ या पात्राला विशेष पसंती दिली जाते.

5 / 8
दिलीप जोशी यांनी 1989 साली 'मैंने प्यार किया है' या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी 420’, ‘हमराज’, ‘फिराक’, ‘whats Your Rashee’ आणि ‘जागते रहो’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

6 / 8
टेलिव्हिजनकडे वळताना त्यांनी ‘दाल मे काला’, ‘कोरा कागज’, ‘रिश्ते’, ‘सीआयडी स्पेशल ब्युरो’, ‘हम सब बाराती’, ‘एफआयआर’ आणि ‘अगडम बगडम तिगडम’मध्ये काम केले आहे. यानंतर, त्यांनी 2008 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

7 / 8
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांचे लग्न मालातुला जोशी यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिलीप जोशी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत.

वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांचे लग्न मालातुला जोशी यांच्याशी झाले असून त्यांना दोन मुले आहेत. दिलीप जोशी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत.

8 / 8
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या