Aamna Sharif | ‘कहीं तो होगा’ची कशिश 14 वर्षांनी कशी दिसते, पाहा खास फोटो

2003 मध्ये स्टार प्लसवरील कहीं तो होगा मालिकेतून आमना शरीफने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यावेळी ती अवघी 21 वर्षांची होती. या भूमिकेमुळे आमनाला प्रचंड लोकप्रियता मिळाली

1/5
'कहीं तो होगा' मालिकेतील कशिशच्या भूमिकेने लोकप्रिय झालेली अभिनेत्री आमना शरीफने नुकतंच एक फोटोशूट शेअर केलं. लव्हेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये आमनाचं रुप खुलून आलं आहे.

2/5
अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते. त्यावर चाहत्यांकडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतो

3/5
2003 मध्ये स्टार प्लसवरील कहीं तो होगा मालिकेतून तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यावेळी ती अवघी 21 वर्षांची होती. या भूमिकेमुळे आमनाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

4/5
39 वर्षांची आमना 2013 मध्ये अमित कपूरसोबत विवाहबंधनात अडकली. तिला अरैन हा मुलगा आहे. लग्नानंतर तिने छोट्या पडद्यापासून विश्रांती घेतली होती. आलू चाट, आओ विश करे, एक व्हिलन अशा मोजक्या चित्रपटातही ती झळकली आहे.

5/5
 2019 मध्ये कसौटी जिंदगी केच्या रिमेकमध्ये आमनाने कोमोलिका ही भूमिका साकारली. हीना खानच्या जागी आमनाने ही व्यक्तिरेखा केली. मात्र मालिकेने अल्पावधीतच निरोप घेतल्याने आमनाचं दर्शन चाहत्यांना फार काळ घडलं नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI