
भोजपुरी क्विन मोनालिसाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आणि चाहत्यांना तिच्या नकारात्मक भूमिका पसंतीस उतरल्या. मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

मोनालिसा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते हे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात. ती तिच्या बोल्ड लूकने लोकांना वेड लावते.

बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या मोनालिसानं आज पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती केशरी रंगाचा सूट परिधान करुन दिसत आहे.

फोटो शेअर करताना मोनालिसानं लिहिलं - तयार होण्याचा आनंद ही एक कला आहे. काही तासांत हजारो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

मोनालिसाचा हा साधा लूक तिच्या चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरला आहे. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.