Mumbai NCB Raid: क्रूझवर पार्टीसाठी मी पाहुणा म्हणून गेलो होतो, चौकशीवेळी शाहरुखचा लेक आर्यनचे 3 मोठे दावे!

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आर्यनने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर तीन दावे केले. त्यातील पहिला दावा म्हणजे क्रूझवरील पार्टीसाठी मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं, असं आर्यनने सांगितलं.

1/5
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आर्यनने एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर तीन दावे केले. त्यातील पहिला दावा म्हणजे क्रूझवरील पार्टीसाठी मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं, असं आर्यनने पोलिसांना सांगितलं.

2/5
या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती. मात्र आर्यनने हे दावे फेटाळले आहेत. पार्टीसाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नव्हती, असा दुसरा मोठा दावा त्याने केला आहे.

3/5
दुसरीकडे कार्यक्रमांच्या आयोजकांनी आपल्या नावाचा वापर करुन इतरांना निमंत्रण दिल्याचा दावा आर्यनने केला आहे. चौकशीदरम्यान एनसीबी अधिकारी विविध प्रश्न विचारत होते. आर्यन त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता.

4/5
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याबरोबर अरबाज मर्चंट, मुनमुन धनीचा, नुपुर सारिका, इश्मीत सिंह, विक्रांत चोकर, गोमित चोपड़ा मोहक जसवाल यांनाही एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.

5/5
काहीच वेळात मुंबईच्या किला कोर्टात या आठही जणांना हजर करण्यात येणार आहे. या कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI