
मिर्झापूर वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मिर्जापुर वेब सीरिजमधील कलाकारांना देखील प्रेक्षक फाॅलो करताना दिसतात. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षिता गौर ही नेहमीच चर्चेत असते.

हर्षिता गौर हिला खरी ओळख ही मिर्झापूर वेब सीरिजमधूनच मिळालीये. हर्षिता गौर ही मिर्झापूर वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत होती. धमाकेदार अभिनय हर्षिता गौर हिने केला.

विशेष म्हणजे हर्षिता गौर हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हर्षिता गौर ही देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नुकताच निळ्या रंगाच्या बिकिनीवरील काही खास फोटो हे हर्षिता गौर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लूकमध्ये हर्षिता गौर ही अत्यंत बोल्ड दिसत आहे.

हर्षिता गौर हिने शेअर केलेल्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. हर्षिता गौर हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत असून तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.