
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांमधून केली. अनेक हिट मालिकांमध्ये उर्फी जावेद हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद ही तिच्या बाॅलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना दिसली. उर्फी जावेद म्हणाली की, मला बाॅलिवूडमध्ये काम करण्याची संधी कधी मिळेल असे मला अजिबात वाटत नाही.

एका कार्यक्रमात एका मोठ्या बाॅलिवूड अभिनेत्याने माझ्यासोबत चुकीचा व्यवहार केला होता. तो अभिनेता माझ्यासोबत फार चुकीचे वागला. मला कधीच संधी नाही मिळणार चित्रपटात काम करण्याची

कारण बाॅलिवूडचे लोक मला कधीच जवळ करत नाहीत. यामुळे माझा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाहीये. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर याने उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर कमेंट केली होती.

उर्फी जावेद याने त्यानंतर रणबीर कपूर याचा देखील समाचार घेतला होता. उर्फी जावेदवर अनेकदा बाॅलिवूड कलाकार टिका करताना देखील दिसतात.