
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या माध्यमातून हिना खान हिने खास ओळख निर्माण केलीये. मालिकेमध्ये अक्षराची भूमिका साकारताना हिना खान दिसली. विशेष म्हणजे या मालिकेतूनच तिला खरी ओळख मिळालीये.

हिना खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग हिना खान हिची सोशल मीडियावर बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच हिना खान ही मक्कामध्ये उनराह करून हिना भारतामध्ये दाखल झालीये.

हिना खान हिने नुकताच खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये हिना खान हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे. हिना खान हिने लाल रंगाचा आउटफिट कॅरी केला असून या लूकमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे.

हिना खान या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी तिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, आताच उमराह करून आलीये आणि तुला असे कपडे घालताना लाज नाही वाटत?

दुसऱ्याने लिहिले की, असेच कपडे घालायचे होते तर मग तू उमराह का केला? तिसऱ्याने लिहिले की, रमजानच्या महिन्यात असे वागताना काहीच वाटत नाही का? आता हिना खान हिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.