
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या संपूर्ण कुटुंबासह मालदीवची सफर करते आहे. ती सतत तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पाहूयात तिची अतिशय खास फोटो.

परिणीती चोप्राला दरवर्षी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत सुट्टी साजरी करायला आवडते. तिने यावर्षी तिच्या सुट्टीसाठी मालदीवची निवड केली आहे.

परिणिती चोप्रा मालदीवमध्ये समुद्रासमोर बसून फोटो क्लिक करत आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

परिणीतीच्या चाहत्यांना तिची स्टाईल खूप आवडते. ती तिच्या कुटुंबासह या फोटोंमध्ये खूप उत्साहित दिसते आहे.

परिणीती चोप्राचे इंस्टाग्रामवर 33.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, ती सोशल मीडियावर तिचे बरेच फोटो शेअर करते, तिच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो पसंतीस उतरतात.

परिणीती चोप्राने स्वतःचे हे अतिशय खास फोटो अतिशय स्टाईलिश अंदाजात शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. परिणीती चोप्राचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ती या फोटोंमध्ये अतिशय हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे.