Sanjay Dutt Home : बॉलिवूडचा ‘खलनायक’ राहतो ते घर आहे तरी कसं? संजय दत्तचा आलिशान बंगला पाहून चकित व्हाल!

संजय दत्तचे मुंबईतील पाली हिल या भागात पॉश घर आहे. याच भागात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार राहतात. संजय दत्त आज ज्या ठिकाणी रहतात तेथे त्यांचे आई-वडील सुनील दत्त आणि नगरिस यांचा बंगला अजंता हा बंगला होता.

| Updated on: Oct 12, 2026 | 6:58 PM
1 / 6
संजय दत्त हा आघाडीचा आणि दिग्गज अभिनेता आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज संजय दत्तकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या प्रतिष्ठीत अशा भागात त्याचे आलिशान घर आहे. संजय दत्तच्या घराचे इंटेरियर थक्क करणारे आहे.

2 / 6

संजय दत्तचे मुंबईतील पाली हिल या भागात पॉश घर आहे. याच भागात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार राहतात. संजय दत्त आज ज्या ठिकाणी रहतात तेथे त्यांचे आई-वडील सुनील दत्त आणि नगरिस यांचा बंगला अजंता हा बंगला होता.

3 / 6

आता याच ठिकाणी संजय दत्त यांनी दिमाखदार अशी नवी इमारत उभी केली आहे. या इमारतीचे नाव इम्पेरियल हाईट्स असे आहे. संजय दत्त यांच्या घरातील लिव्हींग रुप खूपच छान आणि प्रशस्त आहे. लिव्हींग रुममध्ये मोठ्या एलईडी टीव्ही आहेत.

4 / 6

संजय दत्त यांच्या या घरात त्यांच्या आई-वडिलांचाही फोटो लावण्यात आलेला आहे. घराला सुंदर बनवण्यासाठी काच आणि लाकडाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे.

5 / 6

संजय दत्त यांनी आपल्या घरात आर्टवर्क, पेटिंग्स, आर्टिफिशियल फुल, आकर्षक लँप ठेवलेले आहेत. संजय दत्त यांच्या घरी त्यांचे छोटेसे ऑफिसही आहे. सोबतच त्यांच्या घरात जीम आहे. चित्रपट आणि इतर कामे संजय दत्त याच ऑफिसमध्ये बसून करतात.

6 / 6

संजय दत्त यांच्या या घराची किंमत साधारण 40 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्त यांचे न्यूयॉर्कमध्येही एक घर आहे. त्यांचे दुबईतही एक घर आहे. या घरांची किंमत आजघडीला कोट्यवधी रुपये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us