या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून हैराण झालेल्या जया प्रदा, घरा-घरात लागले होते फोटो, लोक करायचे पूजा

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून जया प्रदा देखील राहिल्या होत्या दंग, प्रत्येक घरांमध्ये लागले होते तिचे पोस्टर, कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Apr 09, 2026 | 6:30 PM
1 / 5
चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळते पण काही मोजके कलाकार असे असतात ज्यांना केवळ स्टारडमच नाही तर प्रेक्षकांकडून अपार आदरही मिळतो. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आज जाणून घेणार आहोत.

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळते पण काही मोजके कलाकार असे असतात ज्यांना केवळ स्टारडमच नाही तर प्रेक्षकांकडून अपार आदरही मिळतो. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आज जाणून घेणार आहोत.

2 / 5

दीपिका चिखलिया यांनी रामायण या मालिकेत ‘सीता माता’ची भूमिका साकारून घराघरात विशेष ओळख निर्माण केली. दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या या मालिकेने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

3 / 5

दीपिका यांनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी ठरली की लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘सीता माता’ मानले. अनेक घरांमध्ये त्यांच्या फोटोची पूजा केली जात असे. त्यांनीही आयुष्यभर ही प्रतिमा जपली.

4 / 5

दरम्यान, जया प्रदा यांच्या एका जुन्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जयाप्रदा अतिशय सुंदर दिसत असतानाही त्या एका दुसऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या दिसतात. तो चेहरा म्हणजेच दीपिका चिखलिया. त्यांच्या निरागस चेहऱ्याने, सादगीने आणि लहरत्या केसांनी जयाप्रदालाही थक्क केल्याचे या व्हिडिओत दिसते.

5 / 5

आता दीपिका चिखलिया पुन्हा एकदा रामायणाशी संबंधित प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात त्या प्रभू रामांच्या आईची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us