
धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे या सणाच्या दिवशीच चंद्रग्रहण लागल्याने काही राशींवर त्याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात नेमकी काय खबरदारी घ्यावी, तसेच कोणकोणत्या राशींचे नशीब फळफळण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊ या..

कर्क राशीच्या लोकांसाठी 3 मार्च हा दिवस खूप चांगला असणार आहे. बऱ्याच दिवसापासून अडकून पडलेले काम या दिवशी मार्गी लागू शकते. यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. कोणतेही काम घाईगडबडीत करणे टाळा. मित्र तुमच्या मदतीला धावून येतील.

कन्या राशीच्या लोकांनी 3 मार्च रोजी दुर्लक्ष करू नये. तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे मोठा तोटा होऊ शकते. एखाद्या क्षेत्रातील अनुभव कमी असल्याने तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही एखाद्या लांब यात्रेवर जाऊ शकता. प्रवास करताना काळजी घ्यावी.

धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. आता सगळे संपलेले आहे, असे वाटू शकते. त्यामुळे काळजी घ्या. लोक तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करू शकतात. बिझनेस पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालणे टाळा. आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.