Horoscope : फक्त 23 जानेवारीची वाट पाहा, चंद्राचे गोचर होताच आयुष्य बदलणार, 3 राशींचे नशीब फळफळणार!

23 जानेवारी रोजी चंद्रदेवाचे गोचर होणार आहे. त्याचा परिणाम एकूण तीन राशींवर पडणार आहे. विशेष म्हणजे या राशींच्या आयुष्यात चाांगले दिवस येणार आहेत.

| Updated on: Jan 21, 2026 | 10:50 AM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात चंद्राला शुभ ग्रह म्हटले जाते. चंद्राच्या स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात मोठे चढऊतार होऊ शकतात. येत्या  23 जानेवारी रोजी चंद्र ग्रह सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी गोचर करणार आहे. चंद्राच्या या गोचरमुळे तीन राशींचे नशीब पालटणार आहे. या तिन्ही राशींवर लक्ष्मीमातेची कृपा असेल.

2 / 5
चंद्र ग्रहाच्या गोचरमुळे वृषभ राशीला चांगला लाभ होईल. वसंत पंचमी तसेच त्यानंतरचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. तसेच माता सरस्वतीची तुमच्यावर कृपादृष्टी असेल. विद्यार्थ्यांनी या काळात मन लावून अभ्यास करणे गरजेचे आहे.

3 / 5
चंद्र देवाच्या गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांनाही अनेक फायदे होणार आहेत. तुमच्या ज्ञानात वाढ होईल. माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. अर्धवट राहिलेली अनेक कामे पूर्ण होतील. तसेच या राशीच्या लोकांना भविष्यात लांब यात्रेवर जाण्याचा योग येईल कामाच्या ठिकाणीदेखील अनुकूल स्थिती असेल. फक्त कोणताही निर्णय घेताना थोडी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे

4 / 5
चंद्राच्या गोचरमुळे धनू राशीलाही चांगला फायदा होईल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. तुम्ही पत्नी, आई-वडील यांना वेळ देऊ शकाल. करिअरच्या दृष्टीने काही सकारात्मक गोष्टी घडतील. कामाच्या ठिकाणी तुमची वाहवा होईल. तसेच पैशाचे नवे स्त्रोत तयार होतील. नवी गुंतवणूक करण्याचा हा योग्या काळ असू शकतो.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.