‘दीपज्योती’ मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; कथानकात मोठा ट्विस्ट

हा हाय-व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल. 'दीपज्योती' ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत प्रसाद जवादे, पूर्वा कौशिक, डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्या भूमिका आहेत.

| Updated on: May 13, 2026 | 9:05 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'दीपज्योती' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचा वेगवान प्रवास, कलाकारांचा सहज अभिनय आणि गुंतवून ठेवणारी पटकथा यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान भक्कम केलं आहे.

2 / 5
प्रेक्षकांमध्ये यापुढील कथानकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येणाऱ्या आठवड्यांमध्ये ही मालिका एका अत्यंत मनोरंजक आणि भावनिक वळणावर येणार आहे. जिथे नात्यांची नवी परीक्षा आणि संघर्षाची ठिणगी पाहायला मिळणार आहे.

3 / 5
मालिकेच्या आगामी भागात, दीप आणि ज्योती यांच्यातील अनोखं नातं एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. ज्योतीचं रक्षण करण्यासाठी दीप चक्क वेशांतर करून, येणार आहे. दीपाचं हे वागणं ज्योतीला बेजबाबदारपणाचं वाटून त्यांच्यात वादाची ठिणगी पडणार आहे.

4 / 5
दुसरीकडे, स्वराज आणि प्रीतीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच, ज्योती स्वराजची 'वर चाचणी' घेणार आहे. तर सुलू आत्या प्रीतीची 'वधू चाचणी' घेणार आहे. आता ही वधू वर चाचणी काय असेल हे बघणं औसुक्याचं ठरणार आहे. तणावपूर्ण वातावरणात साखरपुड्याची बोलणी सुरू होणार आहेत.

5 / 5
‘दीपज्योती’ ही प्रेमाने आणि आपुलकीने बांधलेल्या बहीण-भावांच्या नात्याची कथा आहे. ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांच्याभोवती ही गोष्ट फिरते. दुसरीकडे, पुरुषोत्तम यांच्या घरंदाज कुटुंबाची कथा उलगडते. त्यांची तीन मुलं, स्वराज, दीप आणि विराज आणि त्यांच्यासोबत आत्या असते.

Follow Us