
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 24 नोव्हेंबर रोजी अभिनेत्यावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले. यावेळी अत्यंत कमी लोक उपस्थित होते.

देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अत्यंत गुप्तता पाळली. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत शोक सभेचे आयोजन केले. त्यानंतर दिल्लीमध्ये हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलीने आयोजन केले.

यावेळी ईशा देओल हिने वडिलांच्या आठवणीमध्ये खास व्हिडीओ तयार केला होता. विशेष म्हणजे या आठवणीमध्ये तिने सावत्र आई प्रकाश काैर आणि सावत्र बहिणी भावांनाही दाखवले.

धर्मेंद्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश काैर आणि दोन सावत्र बहिणी आणि भावांचीही झलक दाखवली. सनी देओल बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांचा चित्रपटातील एक सीन देखील दाखवली.

ईशा देओल हिने पूर्ण व्हिडीओ क्लिपमध्ये अख्खे देओल कुटुंब दाखवले. आपल्या वडिलांच्या पहिल्या कुटुंबाचीही झलक तिने या व्हिडीओमध्ये दाखवली. धर्मेंद्र यांच्या या प्रार्थना सभेला सनी देओल किंवा बॉबी देओल पोहोचले नव्हते.