Photo : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू; वाढदिवशी फोटो होतोय ट्रेंड

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. (Disha Salian dies six days before Sushant Singh Rajput's death; photos trending on her Birthday)

1/6
Disha Salin
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू आधी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. मात्र तिचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नाही. दिशानं घरावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र काही लोक असंही म्हणतात की संशयास्पद परिस्थितीत तिचा मृत्यू झाला.
2/6
Disha Salin
सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी मृत्यू झाला. असं म्हणतात की तिनं मृत्यूच्या आधी आपत्कालीन क्रमांक 100 डायल केला होता. मात्र मुंबई पोलिसांनी ही वस्तुस्थिती नाकारली होती. मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं की दिशानं अंकिताला मृत्यूपूर्वी बोलावलं होतं. आज तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/6
Disha Salin
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत दोघेही पूर्वीचे खूप चांगले मित्र होते. दोघंही कधी कधी सहलीला जात असत.
4/6
Disha Salin
दिशा सालियनचं प्रकरण सुशांतच्या केसशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.
5/6
Disha Salin
दिशाच्या बाबतीत भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते की, तिनं आत्महत्या केली नव्हती तर बलात्कार करून तिची हत्या केली गेली.
6/6
Disha Salin
दिशा सालियन मुंबईतील अनेक बड्या कलाकारांची मॅनेजर होती. ज्यामध्ये वरुण शर्माचाही समावेश आहे.