Diwali 2026 : दिवाळीत घराला आगीपासून वाचवायचंय? ही 5 सुरक्षा गॅजेट्स ठरतील उपयोगी

कधी कधी नकळत आपण फटाके अशा गोष्टीवर ठेवून पेटवतो.ज्यामुळे क्षणात आग लागू शकते. अशा परिस्थितीत, काही स्मार्ट गॅजेट्स आणि अग्निसुरक्षा उपकरणे मोठे अपघात टाळण्यास मदत करू शकतात. कोणते गॅजेट्स असावेत त्याचा वापर कसा करावा, जाणून घ्या

| Updated on: Nov 09, 2026 | 4:38 PM
1 / 6
दिवाळीत फटाके, वीजेचे दिवे आणि पणत्या आणि मेणबत्त्यांमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागण्याचा धोका असतो. कधी कधी नकळत आपण फटाके अशा गोष्टीवर ठेवून पेटवतो.ज्यामुळे क्षणात आग लागू शकते. अशा परिस्थितीत, काही स्मार्ट गॅजेट्स आणि अग्निसुरक्षा उपकरणे मोठे अपघात टाळण्यास मदत करू शकतात. कोणते गॅजेट्स असावेत त्याचा वापर कसा करावा, जाणून  घ्या

दिवाळीत फटाके, वीजेचे दिवे आणि पणत्या आणि मेणबत्त्यांमधून निघणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागण्याचा धोका असतो. कधी कधी नकळत आपण फटाके अशा गोष्टीवर ठेवून पेटवतो.ज्यामुळे क्षणात आग लागू शकते. अशा परिस्थितीत, काही स्मार्ट गॅजेट्स आणि अग्निसुरक्षा उपकरणे मोठे अपघात टाळण्यास मदत करू शकतात. कोणते गॅजेट्स असावेत त्याचा वापर कसा करावा, जाणून घ्या

2 / 6

स्मोक डिटेक्टर : आग लागण्यापूर्वी तुम्हाला सूचना मिळते : धूर शोधक (स्मोक डिटेक्टर) हे घराच्या सुरक्षेसाठी सर्वात आवश्यक उपकरणांपैकी एक आहे. ते हवेतील धूर आणि कण ओळखते आणि वेळीच धोक्याचा इशारा देते.याचा फायदा असा आहे की, जर रात्री एखाद्या खोलीत, विजेच्या सॉकेटजवळ किंवा पडद्यांजवळ आग लागली, तर ते डिव्हाईस आवाज करून आग लागल्याची सूचना देते.

3 / 6

फायर एक्सटिंग्विशर : लहान आग पसरण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त :घरात फायर एक्सटिंग्विशर यंत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे एक पोर्टेबल उपकरण असून त्यात एक विशेष अग्निशामक द्रव भरलेले असते. ज्यामुळे मोठ्या आगही विझवता येते. याचा वापर केवळ आग सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच केला पाहिजे

4 / 6

फायर ब्लैंकेट: : स्वयंपाकघरातील लहान आगीसाठी उपयुक्त फायर ब्लँकेट हे एक विशेष प्रकारचे अग्निरोधक ब्लँकेट आहे, जे लहान आग झाकण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करण्यासाठी वापरले जाते. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना लागणाऱ्या लहान आगीच्या बाबतीत हे विशेषतः उपयुक्त ठरू शकते.

5 / 6

हीट डिटेक्टर: स्मोक डिटेक्टर धूर ओळखतो, तर हीट डिटेक्टर तापमानातील असामान्य वाढ ओळखतो. ज्या ठिकाणी सामान्य स्मोक डिटेक्टर वारंवार चुकीचे इशारे देतात, अशा ठिकाणी हे उपयुक्त ठरू शकते.हीट डिटेक्टर स्वयंपाकघर, गॅरेज किंवा एखाद्या तांत्रिक खोलीत बसवता येतो. जर एखाद्या जागेतील तापमान एका निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाले, तर तो अलार्म वाजवतो.

6 / 6

स्मार्ट प्लग और ओवरलोड प्रोटेक्शन: दिवाळीच्या काळात घरांमध्ये अनेकदा विविध प्रकारचे इलेक्ट्रिक झुंबर, एलईडी दिवे आणि सजावटीच्या वस्तू लावल्या जातात. या सर्वांना एकाच सॉकेट किंवा एक्स्टेंशन बोर्डला जोडल्याने ओव्हरलोडिंग आणि ओव्हरहीटिंगचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.अशा परिस्थितीत, चांगल्या दर्जाच्या एक्स्टेंशन कॉर्ड आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन असलेले स्मार्ट प्लग उपयोगी ठरतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us