AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTOS : 6 महिने उलटूनही मागण्या मान्य नाही, शेतकऱ्यांचा देशभरात एल्गार, महाराष्ट्रातही पडसाद

बुधवारी (26 मे) संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्यावतीने देशभरात काळा दिवस पाळण्यात आला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी शेतकरी आणि सामाजिक संघटना निषेध करताना दिसल्या.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 27, 2021 | 5:18 AM
Share
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला 6 महिने पूर्ण झाले तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्याविरोधातच निषेध करण्यासाठी बुधवारी (26 मे) संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर व कामगार संघटनांच्यावतीने देशभरात काळा दिवस पाळण्यात आला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी शेतकरी आणि सामाजिक संघटना निषेध करताना दिसल्या.

1 / 8
परभणीत काळा दिवस पाळत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचं दहन केलं. लॉकडाऊनमध्ये कामगार शेतकऱ्यांनी जगायचे कसे? शेतकरी विरोधी कायदे कोणाच्या हितासाठी? कामगार विरोधी कायदे कशाला आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थितांनी विचारले.

2 / 8
संगमनेरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवुरकर, शिवाजी गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आपल्या घरावर काळे झेंडे लावत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

3 / 8
तसेच 6 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यानं मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी घरावर काळा झेंडा फडकावल्याची भूमिका त्यांनी मांडली.

4 / 8
यावेळी ज्ञानेश्वर राक्षे आणि कॉ. ज्ञानदेव सहाणे यांनीही आपल्या घरावर काळा झेंडा लावत सरकारचा निषेध केला.

5 / 8
संगमनेरमध्ये छात्रभारती संघटनेच्यावतीने कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच संगमनेर पोलीस स्टेशनला निवेदन देत काळे झेंडे दाखवण्यात आले.

6 / 8
नाशिकमध्ये राष्ट्र सेवा दल, छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पाळून निषेध नोंदवला.

7 / 8
शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. याच दिवशी 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाही. म्हणून शेतकरी आंदोलनाने आज काळा दिवस म्हणून निषेध दिन पाळण्याचे ठरवल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली.

8 / 8
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...