डिमार्ट स्वस्तात सामान देऊनही कोट्यावधीचा नफा कसा कमावतो, जाणून घ्या सोपे गणित..
डिमार्टमध्ये जवळपास वस्तू स्वस्तामध्ये मिळतात. डिमार्ट आपल्या ग्राहकांना मोठी सवलत देतो. 2002 मध्ये पहिले डिमार्ट सुरू झाले. त्यानंतर आज 2026 मध्ये डिमार्टच्या स्टोरची संख्या 500 वर पोहोचली आहे. डिमार्ट ग्राहकांना स्वस्तात वस्तू देऊनही मोठी कमाई करतो.

डिमार्टकडून आपल्या ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जातात. एकावर एक वस्तू मोफतमध्येही दिली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा तुम्हाला गर्दीच असते. लोक मोठ्या संख्येने डिमार्टमध्ये खरेदी करतात.
बाजार भागापेक्षा डिमार्टमध्ये वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. बाहेर 100 रूपयांना मिळणारी वस्तू डिमार्टमध्ये 50 लाच मिळते. सामान इतके स्वस्त देऊनही कोट्यावधींचा नफा डिमार्ट कमावतो.
2002 मध्ये डिमार्टने पहिले स्टोर सुरू केले आणि आजच्या घडीला तो कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत.सामान इतके स्वस्त देऊन डिमार्ट कमाई नक्की कशी करते, असा सवाल अनेकांना पडतो.
त्याचे देखील उत्तर आहे. डिमार्ट एकाच वेळी खूप जास्त साहित्य खरेदी करतो.त्यामुळे इतर दुकानदारांपेक्षा डिमार्टला खूप स्वस्तात वस्तू मिळतात. प्रत्येक वस्तूचा खरेदी खर्च कमी होतो आणि स्पर्धात्मक किंमतही कमी होते.
डिमार्टने उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. डिमार्टने 2025-26 या आर्थिक वर्षात 85 नवीन स्टोअर्स उघडली आहेत. आता त्यांच्या स्टोअर्सची संख्या देशभरात 500 वर पोहोचली आहे.