तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण… महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद

भारतात अनेक सण आणि सोहळे साजरे केले जातात... अशात अनेक मंदिरांमध्ये भंडारा देखील ठेवला जातो... पण श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला... भंडाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 08, 2026 | 3:00 PM
1 / 5
बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी असंख्य भक्तांनी हजेरी लावली आणि महाराजांचं दर्शन घेतलं.

बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराजांचा आगळा वेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला. भंडाऱ्यासाठी असंख्य भक्तांनी हजेरी लावली आणि महाराजांचं दर्शन घेतलं.

2 / 5

भंडाऱ्यात तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण, अशा प्रकारे महाप्रसादाचे स्वरूप असून ज्वारीच्या भाकरी तयार करण्याचे काम पंचक्रोशीतील महिलाच करतात...

3 / 5

महत्त्वाचं म्हणजे उडदाची डाळ ही हौदात तयार केली जाते... या महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत संपूर्ण महाप्रसाद तयार होत नाही, तोपर्यंत कुणीही महाप्रसाद सेवन करत नाही...

4 / 5

यावेळी लाखो भाविकांनी हा महाप्रसाद घेतला. शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या भक्तीभावाने भक्त याठिकाणी येत असतात. फोटो देखील भक्तीमय वातावरण दिसत आहे.

5 / 5

शिवाय महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीच पुरुष महाप्रसाद सेवन करत नाही... हे विशेष.. हा आगळा वेगळा महाप्रसाद लोक वर्गणीतून केल्या जात असून महाप्रसाद कुणालाच कमी पडत नाही ..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us