महाराष्ट्र हादरला! मित्रासोबत बसलेली दिसली, त्यांच्यातला सैतान जागा झाला, तरुणीवर तिघांकडून पाशवी अत्याचार!

संपूर्ण राज्याला चीड यावी असा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेचा नराधमांनी व्हिडीओदेखील केल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Oct 20, 2025 | 5:44 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाली आहे. यातही महिला अत्याचाराच्या प्रकरणात तर लक्षणीय वाढ झाली असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

2 / 6
हीच चिंता आणखी वाढवणारी एक धक्कादायक घटना आता समोर आल आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात एक सामूहिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली येथे नराधमांकडून मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत.

3 / 6
पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत बसलेली असताना तिघांनी तिच्याजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

4 / 6
घृणास्पद बाब म्हणजे हा अत्याचार करत असताना आरोपींनी व्हिडीओही तयार केले आहेत. 14 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असून आता तो उजेडात आला आहे.

5 / 6
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा जणांना अटक देखील केली आहे. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 / 6
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. सोबतच परभणीसारख्या जिल्ह्यात असा प्रकार घडल्यामुळे सध्या तिथे तणावाचे वातावरण आहे. लोकांकडून चीड व्यक्त केली जात आहे.