Girija Oak: त्याने पाठीवर मानेपासून ते कंबरेपर्यंत बोट फिरवलं अन्… गिरिजा ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

Girija Oak New National Crush: गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही चर्चेत आहे. ती सध्याची न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच तिने धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Updated on: Nov 15, 2025 | 3:14 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे गिरिजा ओक. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक झाले आहे. सध्या गिरिजा तिच्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या लूकने अनेकांना घायाळ केले आहे. या लूकमुळे ती न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये गिरिजाने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

2 / 5
गिरिजाने नुकताच लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने उघडपणे अनेक विषयांवर वक्तव्य केले. तसेच तिने तिच्या आयुष्यात आलेले अनेक वाईट अनुभव देखील सांगितले आहे. तिने एकदा लोकल ट्रेनमध्ये आलेला वाईट अनुभव देखील सांगितला आहे. एका मुलाने गिरिजासोबत अतिशय वाईट कृत्य केले होते. अचानक तिच्या पाठीवर चुकीच्या पद्धीतने हात फिरवला होता. पण गिरिजाला कळेपर्यंत त्याने पाठ फिरवली होती. त्यामुळे तो नेमका कोण होता हे तिला कळाले नाही.

3 / 5
"लोकल ट्रोनमध्ये असे स्पर्श करुन निघून जाणे, कधी धक्का देणे हे सगळं खूपच सर्वसामान्य झाले आहे. आपल्याला सतत जागरुक राहणे गरजेचे असते.  मी लोकल ट्रेनमधून प्रवास करत होते. पाठीमागून एक मुलगा आला. मला माहिती नाही कुठून आला तो कारण मला जराही चाहूल लागली नाही. कारण तो एका साईटने आला असेल कदाचित" असे गिरिजा म्हणाली.

4 / 5
पुढे गिरिजा म्हणाली की, "त्याने बोटाने माझ्या पाठीवर, मानेपासून ते कंबरेपर्यंत अलगद बोट फिरवले. त्यानंतर तो पटकन उलटा फिरला." गिरिजाला कळेपर्यंत तो मुलगा उलटा फिरला होता. त्यामुळे तो मुलगा कोण होता? काय करतो? याविषयी गिरिजाला काहीच कळाले नाही. पण तिने हा धक्कादायक अनुभव मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

5 / 5
गिरीजाचे याच मुलाखतीमधील काही सिंपल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ती न्यू नॅशनल क्रश ठरली आहे. या मुलाखतीमध्ये तिने फिकट निळ्या रंगाची प्लेन अशी कॉटनची साडी नेसली होती. त्यावर पांढऱ्या रंगाचा स्लिवलेस ब्लाऊज घातला होता. मोकळे केस, गळ्यात सिंपल नेकलेस, हातात बांगड्या घातल्या होत्या. या सिंपल लूकमध्ये गिरिजा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंनी अनेकांना घायाळ केले आहे.