Girija Oak: हिच्यापेक्षा सुंदर काहीच नाही.. गिरीजा ओकचा लूक पाहून नजर हटणार नाही
Girija Oak: गिरीजा ओकचा हा लूक विशेष लक्षवेधी ठरण्याचं कारण म्हणजे पारंपरिक साडीला तिने दिलेला एलिगंट टच. अतिशय कमी मेकअप, पारंपरिक दागिने आणि साडीतील तिचं सौंदर्य यामुळे तिचा लूक खुलून आला आहे. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर ‘सौंदर्य म्हणजे साधेपणात दडलेलं असतं’ असंच म्हणावंसं वाटतं.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासोबतच तिच्या साध्या, मोहक आणि पारंपरिक लूकसाठीही नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोशूटमधील लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंमध्ये गिरीजा सुंदर पैठणी साडी नेसून पारंपरिक अंदाजात दिसत आहे.
तिच्या या लूकवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गिरीजाने या फोटोशूटसाठी हिरवट-पिवळ्या रंगाची आकर्षक पैठणी निवडली आहे. साडीचा पारंपरिक पोत आणि त्यावर असलेली नक्षी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसते. साडीला लाल रंगाचा बॉर्डर असल्यामुळे संपूर्ण लूकला सुंदर कॉन्ट्रास्ट मिळाला आहे.
यासोबत तिने पारंपरिक दागिने परिधान केले असून, तिचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे. विशेष म्हणजे गिरीजाने हे फोटोशूट प्रसिद्ध पृथ्वी थिएटरमध्ये केलं आहे.
थिएटरमधील आसनव्यवस्था आणि मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर गिरीजाचा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसतो. अभिनय आणि रंगभूमीशी असलेलं तिचं नातं लक्षात घेता, या फोटोशूटसाठी पृथ्वी थिएटरची निवडही विशेष ठरते.
या पोस्टमध्ये गिरीजाने तिच्या साडीचा आणि दागिन्यांचा उल्लेखही केला आहे. गिरीजाच्या या फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास आणि पारंपरिक सौंदर्य दोन्ही पाहायला मिळतं.
गिरीजाच्या या पोस्टवर फोटोग्राफर आणि साडीच्या ब्रँडकडूनही कमेंट्स करण्यात आल्या आहेत. चाहत्यांनाही तिचा हा साधा पण अत्यंत देखणा अंदाज पसंत पडला आहे.