Gold And Silver Price: मकर संक्रांतीला सोने-चांदीचा महागाईचा पतंग आकाशी! 10 ग्रॅमसाठी मोजा इतकी रक्कम;आजचा भाव काय?

Gold And Silver Price: मकर संक्रांतीला सोने-चांदीचा महागाईचा पतंग आकाशी उंचावला आहे. चांदीच्याच नाही तर सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारासह वायदे बाजारातही दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली आहे. काय आहे आजचा भाव?

KALYAN DESHMUKH | Updated on: Jan 14, 2026 | 3:21 PM
1 / 6
मकर संक्रांतीला सोने आणि चांदीचा पतंग आकाशी झेपावला आहे. दोन्ही धातुत मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या भावाने मुसंडी मारली आहे. तर सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सोने आणि चांदी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचले आहेत. त्यामुळे ग्राहकांवर संक्रांत आली आहे. सणाच्या मुहूर्तावर त्यांना सोने-चांदीची खरेदी (Jalgaon Sarafa Market) चांगलीच महागात पडली आहे.

2 / 6
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली.  सोने-चांदीचे दर नव्या विक्रमी उच्चांकीवर पोहोचले. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही धातुंनी सणासुदीला मोठी मुसंडी मारल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आज अनेकांच्या खिशावर संक्रात पडली आहे.

3 / 6
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 46 हजार 260 रुपयांवर तर  चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 90 हजार 460 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर दीड लाखांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर 3 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. जळगावात सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दर नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत.

4 / 6
सोन्यात गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत जवळपास 6,489 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव सुसाट आहे. सोन्यापेक्षा चांदीने मोठी मुसंडी मारली आहे. जळगाव सराफा बाजारात चांदीने पाच दिवसांत मोठी मुसंडी मारली आहे. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत चांदी सुमारे 39 हजार 140 रुपयांनी महागली आहे.

5 / 6
वायदे बाजारातही सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली आहे. आज 14 जानेवारी रोजी 5 फेब्रुवारी रोजी एक्सपायर होत असलेल्या वायदे बाजारात सोने 1,43,007 रुपयांवर व्यवहार करत होते. मागील दिवसाच्या बंद किंमतीपेक्षा ही किंमत 800 ने वाढ झाली आहे. तर 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेली एक किलो चांदी एमसीएक्सवर 2,86,404 रुपयांवर होती. मागील बंद किंमतीपेक्षा सुमारे 11,200 रुपयांनी ही किंमत वधारली आहे.

6 / 6
अमेरिका आणि इराणमधील पुन्हा वाढलेला तणाव, मध्य-पूर्वेतील अशांतता, दुसरीकडं रशिया-युक्रेन युद्धाची धग, ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण यामुळे जागतिक बाजारात अशांतता आणि अनिश्चिततेचे ढग दाटले आहे. त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातुच्या किंमतींवर झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांची पडझड यामुळे या तेजीला मोठा हातभार लागला आहे. भूराजकीय तणावाचा मोठा फटका सोने-चांदीच्या किंमतीला बसला आहे.