Gold Rate : बायकांनी दागिने करायचे की नाही? चांदीचा महारेकॉर्ड, 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल…

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढला आहे.

Updated on: Nov 27, 2025 | 7:20 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळतोय. कधी सोन्याचा भाव धाडकन कमी होत आहे. तर कधी हेच सोने महाग होत आहे. आजदेखील सराफा बाजारात मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे.

2 / 5
महाराष्ट्रात जळगावचा सराफा बाजार सर्वाधिक प्रसिद्ध आहे. येथील सोने सर्वोच्च प्रतिचे मानले जाते. याच जळगाममध्ये सोन्यासोबतच चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत चांदीच्या दरात तब्बल 6 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे

3 / 5
या भाववाढीसह चांदीचा भाव आता जीएसटीसह थेट 1 लाख 70 हजार 980 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे सोन्याच्या भावतही थेट 800 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीसह सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 29 हजार 574 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.

4 / 5
 आज सोन्याच्या भावापेक्षा चांदीचा भाव जास्तच वाढला आहे. महिन्याभरानंतर चांदीच्या दराने पुन्हा 1 लाख 70 हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता भविष्यात सोन्यापेक्षा चांदीचा भाव जास्त वधारणार का असं विचारलं जातंय.

5 / 5
दरम्यान, सध्या लग्नसराई चालू आहे. त्यामुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात होत असलेली वाढ लक्षात घेता भविष्यात दोन्ही मौल्यवान धातू किती महाग होणार? भविष्यात सामान्यांना दागिने करणे परवडणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.