Gold Silver Rate : सोन्याचा भावा झाला धडाम, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार? जाणून घ्या

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. दिवाळीआधी वधारलेला सोन्याचा भाव आता खाली आला आहे. आजदेखील सोने चांगलेच स्वस्त झाले आहे.

| Updated on: Nov 17, 2025 | 4:34 PM
1 / 6
gold rate todayगेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीआधी सोने चांगलेच महागले होते. दिवाळसण झाल्यानंतर सोने तसेच चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत कमी झाली होती.

2 / 6
दरम्यान, आता पुन्हा एकदा सोने स्वस्त झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने स्वस्त झाल्याने सामान्यांकडून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 220 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

3 / 6
 अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेकडून केल्या जाणाऱ्या व्याजदर कापातीबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे.  दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 14 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.

4 / 6
सध्या मुंबई, चेन्नई, कोलकाता या महत्त्वाच्या शहरांत 22 कॅरेट सोन्याची किंमत 114640  रुपये प्रति 10 ग्रॅम तर  24 कॅरेट सोन्याची किंमत 125070 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत खाली आली आहे.

5 / 6
महाराष्ट्रातील पुणे आणि कर्नाटकातील बंगळुरू शहरातही सोन्याचा भाव घसरला आहे. या दोन्ही शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 125070  रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 114640 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

6 / 6