चांगले दिवस आले! सोनं तब्बल 4500 रुपयांनी स्वस्त; एक तोळं सोन्यासाठी लागणार फक्त इतके रुपये
युद्धा संदर्भातील शांतीवार्ता यशस्वी झाली तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. सध्या मात्र सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.

सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ होतेय तर कधी हाच भाव घसरताना दिसतोय. इराणच्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावात ही अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज पुन्ह एकदा सोन्याचा भाव चांगलाच कमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

चार दिवसात सोन्याच्या दरात चार हजार चारशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रूपये प्रति तोळा एवढा खाली आला आहे. चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाला आहे.

अमेरिका इराण तसेच रशिया युक्रेन यांच्यात युद्ध संदर्भात शांतीवार्ता असफल ठरल्याने सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत. दर कमी झाले असले तरी मोदींच्या आवाहनामुळे सराफा दुकानामध्ये नागरिकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं सराफ व्यावसायिक सांगत आहेत.

युद्धा संदर्भातील शांतीवार्ता यशस्वी झाली तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिक व्यक्त करत आहेत. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)