
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 देशावर लादलेला टॅरिफ बेकायदा असल्याचा निर्णय दिल्यानंतर वैश्विक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच अस्थिरतेमुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. परंतु तरीदेखील सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत आहे.

सोने आणि चांदीच्या भावात 26 जानेवारी रोजी मोठी घसरण झालेली पहायला मिळाले. गुरुवासी चांदीचा भाव तब्बल 7400 रुपयांनी कमी झाला आहे. त्यानंतर आता एक किलो चांदीची किंमत 2 लाख 70 हजार रुपये झाली आहे.

याआधी चांदीचा अगोदरचा भाव 2,77,900 रुपये प्रति किलो होता. चांदीप्रमाणेच सोन्याचा भावदेखील घसरला आहे. आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,300 रुपयांनी घसरून थेट 1,62,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (सर्व कर मिळून) पोहोचला आहे.

याआधी सोन्याचा भाव 1,64,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या आठवड्यात सुरुवातीचे तीन दिवस सोन्याचा भाव सातत्याने वाढत होता. त्यानंतर आता सोन्याला एका प्रकारची घसरणच लागली आहे. सोन्याची ही घसरण पाहून आता भविष्यातही असाच भाव परतणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)