
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका भारतात बसायला सुरुवात झाली आहे. भारतात इंधनाचा दर वाढण्याची शक्यता आहे. यासह आता सोने आणि चांदीचाही भाव वाढत आहे. आज पुन्हा एकदा जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे.

आज सकाळच्या सात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर तीन तासात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तीन तासानंतर सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 834 रुपयांवर पोहोचला असून तर चांदीचा दर जीएसटीसह 3 लाख 3 हजार 850 रुपयांवर पोहोचला आहे. सकाळी सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली होती..

अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोन्या आणि चांदीच्या दारावर होत असून दरात चढउतार होत आहे. भविष्यातही युद्ध चालूच राहिल्यास सोने, चांदी आणखी वधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामान्यांची दागिने करण्याचे स्वप्न एका प्रकारे अधुरेच राहते की काय? असे विचारले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)