Gold Rate : बापरे बाप! सोनं एका दिवसात तुफान वाढलं, 10 ग्रॅमचा भाव थेट पोहोचला….सामान्यांच्या खिशाला झळ!

सध्या सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भविष्यातही सोने, चांदीचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 4:17 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षात या दोन्ही धातूंची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. कारण आज (5 जानेवारी) सोन्यासोबतच चांदीचाही भाव आश्चर्यकारक पद्धतीने वाढला आहे.

2 / 5
नव्या वर्षात सोन्याचा भाव दीड लाखांच्या तर चांदीचा भाव हा अडीच लाख रुपयांच्याही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कधी-कधी या दोन्ही धातूंचा भाव धाडकन खाली घसरल्याचे दिसतेय. तर कधी बाजार सुरू होताच सोन्याचा भाव थेट शिखर गाठताना दिसतोय. आज पुन्हा सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे.

3 / 5
दरम्यान सुनर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावाच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या भावात मोठी उलथापालथ झाली आहे. सोन्याच्या दरात 1600 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावाने थेट शिखर गाठले आहे.

4 / 5
या नव्या भावानंतर आता सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 39 हजार 668 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह तब्बल 2 लाख 47 हजार 200 रुपये प्रति किलोवर गेला आहे. त्यामुळे  आता लवकरच चांदीचा भाव हा अडीच लाख रुपयांच्या पुढे तर सोन्याचा भाव हा दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
दरम्यान, सध्या सोने आणि चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. बाजारातील स्थितीमध्ये बदल होताच या दोन्ही धातूंचे मूल्य कमी-जास्त होते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच योग्य तो सल्ला घेऊनच या दोन्ही धातूंमध्ये पैशांची गुंतवणूक करावी.