Gold Rate : सोन्याचा भाव पाहून झोप उडाली, एका दिवसात वाढला तब्बल…10 ग्रॅमचा रेट किती?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात कधी वाढ तर कधी घसरण होत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करणे सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे.

| Updated on: Feb 25, 2026 | 3:48 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळतोय. जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, अमेरिकेचे व्यापारविषयक धोरण, टॅरिफचा वाद यामुळे सध्या सगळीकडेच अस्थिरता पाहायला मिळत आहे.

2 / 5
याचाच परिणाम म्हणून सोने आणि चांदीचा भावदेखील कधी वाढताना पाहायला मिळतोय तर कधी सोन्याचा भाव क्षणात घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा आकदा हा सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. ना भाव पाहून सामान्यांची चिंता वाढली आहे.

3 / 5
सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव एकूण 800 रुपयांनी वाढला आहे. या भाववाढीसह आता सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 64 जात 594 रुपयांवर गेला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5
या भाववाढीसह चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 83 हजार 250 रुपयांवर पोहोचला आहे. आता सध्या अमेरिकेन लावलेल्या टॅरिफसंदर्भात अस्थिरता आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळेच सोने आणि चांदीचा भाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)