Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सराफ बाजारातील आजचे दर हे सर्वसामान्यांच्या चेहरावर आनंद आणणारे आहेत. कारण सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

| Updated on: Apr 13, 2026 | 3:06 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारातील सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र, आज 13 एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

2 / 5

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सराफ बाजारावर देखील होताना दिसला. आता या युद्धाला युद्धविराम लागल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

3 / 5

आज, 13 एप्रिल रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची आणि चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाल्याचे चित्र आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 48 हजार 230 रुपये मोजावे लागणार आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us