Todays Gold Price: वाह! सोन्याचा भाव चांगलाच उतरला, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
Todays Gold Price: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्या आणि चांदीचे भाव आज अखेर कमी झाले आहेत. हे सर्वसमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती आहे...

भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मौल्यवान समजले जाणारे सोने हे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. सोन्याचे वाढते दर पाहून सर्वसामान्य लोकांना ते न परवडणारे वाटू लागले आहेत. काही लोकांसाठी तर सोने खरेदी करणे हे स्वप्नासारखे वाटत आहे.

गेल्या वर्षी पासून सोन्या आणि चांदीचे दर हे सतत वाढताना दिसत आहेत. आता हे दर आकाशाला स्पर्श करत असताना आजचा दिवस हा चांगला आहे. कारण, आज सोन्याचे दर हे कमी झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा...

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्या चांदीच्या दरात गेल्या महिनाभरापासून चढ उतार सुरू असल्याचे ग्राहक संभ्रमात आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)