Todays Gold Rate: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

Todays Gold Rate: अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. पण अक्षय तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी सोने खरेदीचा आजचा दिवस हा सर्वात उत्तम ठरणार आहे.

| Updated on: Apr 20, 2026 | 2:18 PM
1 / 5
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने आणि चांदीच्या खरेदीकडे कल असतो. त्याच प्रमाणे काल, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकांनी सोने खरेदी केले आहे. मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांची दिली आहे. पण अक्षय तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर हे चांगलेच कोसळले आहेत.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर सर्वसामान्यांचा चांदी खरेदीचा विचार असेल तर आजचा दिवस हा चांगला ठरेल.

3 / 5

20 एप्रिल म्हणजे आज, 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 56 हजार 650 रुपये मोजावे लागणार आहेत. कालचा तुलनेत आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

4 / 5

तर आज एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 62 हजार 650 रुपये मोजावे लागणार आहेत. मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा सोने आणि चांदीच्या दरावर देखील होत असल्याचे चित्र आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us