Todays Gold price: युद्ध विराम घोषीत होताच सर्वसामान्यांना मोठा फटका! आता सोने खरेदी करणं शक्यच नाही
Todays Gold price: अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम होताना दिसत होता. पण युद्धविराम लागताच सोन्याच्या दराने आकाशाला स्पर्श केला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून अमेरिका आणि इराण या दोन्ही शक्तीशाली देशांमध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा परिणाम जगातील अनेक गोष्टींवर होताना दिसला. पण जसे या युद्धाला दोन आठवड्यांचा युद्ध विराम लावण्यात आला याचा मोठा फटका भारतातील सर्वसामान्यांना बसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन आठवड्यांच्या सीजफायरची घोषणा करण्यात आली. याचा मोठा परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झाला.

आज, 8 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात 4 हजार रूपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हे वाढलेले दर पाहून सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार 410 रुपयांवर आले आहेत. पूर्णपणे युद्ध थांबण्याची घोषणा झाल्यास सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)