सोन्याच्या दरात घसरण.
संग्रहित छायाचित्र.
Gold Rate Today
धनत्रयोदशीच्या दिवशीही सोन्याचे भाव कमी असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली.
आज भाव वाढूनही सोने बाजारात मोठ्या प्रमाणावर चैतन्य आहे.
पुण्यात धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दर प्रति तोळ्यासाठी 53 हजार, तर चांदीचे दर रुपयांवर आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 40 टक्के दर वाढले आहेत.
शुक्रवारी जळगावातील सोन्याचा भाव 51 हजार 100 प्रति तोळे इतका होता तर चांदी 63 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.
दरम्यान, शुक्रवारी धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली.
IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात आहेत.