सोन्यात मोठी पडझड, दागिने करण्याची हीच योग्य वेळ? वाचा 10 ग्रॅम सोन्याचा नवा भाव काय?
सोन्याचा दर सतत कमी होत असल्याने भविष्यातही हा दर आणखी घसरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहीही असले तरी सध्या मात्र सोनं घसरल्याने सर्वसामान्य लोक आनंद व्यक्त करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. या घसरणीमुळे सोने खरेदी करण्याची हीच संधी असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1 हजार 800 रुपयांची घसरण झाली आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात कुठलीही घसरण झाली नसून दर स्थिर आहे. आजच्या घसरणीसह सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये प्रति किलो यावर स्थिर आहे.

दरम्यान सोन्याचा दर सतत कमी होत असल्याने भविष्यातही हा दर आणखी घसरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहीही असले तरी सध्या मात्र सोनं घसरल्याने सर्वसामान्य लोक आनंद व्यक्त करत आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)