सोन्याचा भाव पाहून फुटला घाम, तब्बल 15000 हजारांनी वाढलं…एका तोळ्यासाठी तब्बल…

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव वाढण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात सोनं वाढण्याऐवजी त्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढत आहे.

| Updated on: Mar 25, 2026 | 9:33 PM
1 / 5
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतात सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतात सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय.

2 / 5

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव वाढण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात सोनं वाढण्याऐवजी त्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढत आहे.

3 / 5

सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांत तब्बल 15000 रुपयांनी वाढला आहे. सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1,29,595 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला होता. आता मात्र सोमवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 15 हजार रुपयांनी वाढला आहे.

4 / 5

सोन्याचा भाव बुधवारी 14,975 रुपयांच्या वाढीसह 1,44,570 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. दरम्यान, दोन दिवसांत सोनं तब्बल 15 हजार रुपयांनी वाढल्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत सोनं असंच वाढत राहणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us