सोनं झालं खूपच स्वस्त, एकाच दिवसात चक्क इतकी घसरण, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?
गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीचा दर कधी कमी होतोय तर कधी जास्त होतोय. सध्या सोन्याचा भाव चांगलाच कमी झाला आहे. त्यामुळे लोकांना दागिने करण्याची चांगली संधी चालून आली आहे. सध्याचा सोन्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊ या...

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव कधी घसरतोय तर कधी हाच भाव वाढत आहे. सध्या 22 एप्रिल रोजी सोनं पुन्हा एकदा स्वस्त झालं आहे.

सोनं सध्या स्वस्त झालं आहे. आकड्यांत सांगायचे झाल्यास मुंबईच प्रत्येक 10 ग्रॅम मागे 24 कॅरेट सोन्याचा भाव 540 रुपयांनी घसरला आहे. कालच्या तुलनेत ही घसरण आहे. प्रत्येक ग्रॅममागे सोन्याचा भाव 54 रुपयांनी कमी झाला आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 21 एप्रिल रोजी 155290 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हाच भाव 22 एप्रिल रोजी 154750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. म्हणजेच एका दिवसात सोनं 540 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

एक ग्रॅम सोन्याचा भाव सांगायचे झाल्यास 21 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 15529 रुपये होता. हाच भाव 22 एप्रिल रोजी 15475 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. म्हणजेच सोनं प्रत्येक ग्रॅममागे 54 रुपयांनी कमी झालं आहे. आता भविष्यातही सोनं असंच कमी होणार का? असे विचारले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)