Gold-Silver Price 02 March 2026 : गुड न्यूज म्हणजे गुड न्यूजच…बायांनो, आता लगेच घाई करा… युद्धाचा भडका तरीही सोने-चांदी झाले स्वस्त, भाव आताच जाणून घ्या; नंतर युद्ध भडकलं तर…
Gold-Silver Rate Today 02 March 2026 Latest News Updates in Marathi: अमेमरिका इस्त्रायल - इराण च्या युद्धाच्या जगभरात मोठा परिणाम दिसून येत असून सोन-चांदीचे दरही गगनाला भिडले होते. मात्र आता जळगावच्या सराफा बाजारातून एक गुड न्यूज समोर आली आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला असून, त्यामुळे अख्खा देश होरपळला आहे. मात्र या युद्धाचे फक्त या तीन देशांवरच नव्हे तर जगभरातही परिणाम दिसत आहेत. या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते.

या युद्धामुळे सराफा बाजारातही मोठी चढउतार होत होती. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोन्याने चांदीच्या दरावर होताना दिसला आहे. त्यामुळे ग्राहकांना घाम फुटला होता.

याच पार्श्वभूमीवर जळगाावच्या सराफा बाजारातून आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. सलग दोन दिवस मोठी वाढ झाल्यानंतर या मौल्यवान धातूंमध्ये आज घसरण झाली आहे

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीचे दर आज घसरले आहेत. सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आज बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 70 हजार 465 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे जीएसटीसह 2 लाख 96 हजार 640 रुपये प्रति किलोंवर आले आहेत.