Suraj Chavan : चेहऱ्यावर तेज, हास्य आणि बेबी बंप.. सुरज चव्हाण-संजनाच्या घरी लवकरच येणार छोटा पाहुणा

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकतीच सुरज चव्हाणच्या घरी भेट दिली. तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुरज चव्हाणची पत्नी संजना ही देखील या व्हिडीओमध्ये दिसली.

| Updated on: Jun 08, 2026 | 4:02 PM
1 / 5
महाराष्ट्रातील फेमस रीलस्टार आणि बिग बॉस मराठी 5 सीझनचा विजेतचा सुरज चव्हाण याचं नाव माहीत नाही, असे लोक विरळाच. अख्ख्या महाराष्ट्रात त्याची चर्चा असते. बिग बॉस मराठीनंतर सुरजने झापूक झुपूक सिनेमात काम केलं. तिकीटबारीवर पिक्चर फार चाललं नाही पण सुरजची आजही घराघरांत चर्चा असते. प्रोफेशनली काम करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा आनंद आला. गेल्यावर्षी त्याचं मामाच्या मुलीशी, संजना हिच्याशी लग्न झालं. आणि आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. (All Photos : Social Media/ Instagram)

2 / 5

सुरजच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सुरज आणि संजना लवकरच आई-वडील होणार आहेत. संजना गरोदर असल्याच्या बातम्या काही काळापूर्वीच आल्या होत्या, तिचे काही फोटोही समोर आले होते, मात्र ते फेक असल्याचे उघड झाले. मात्र आता तिच्या प्रेग्नन्सीच्या न्युजवर शिक्कामोर्चब झालंय . बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक, सुरजची मैत्रीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ती सुरज व संजनासोबत दिसल. याच व्हिडीओतील काही दृश्यांमधून संजनाच्या प्रेग्नन्सीबद्दल कन्फर्म झालंय.

3 / 5

नोव्हेंबर 2025 ला सुरज आणि संजना यांचं लग्न झालं. हळद, मेहंदीपासून ते लग्नापर्यंत जान्हवी आवर्जून हजर होती. ती कायम सुरजच्या संपर्कात असते. नुकतीच ती जेजुरीला गेली होती, तिथून ती सुरज-संजनाच्या घरी जाऊन त्यांना भेटली. त्या भेटीचा व्हिडीो जान्हवीने शेअर केला आहे. "कोणी असो-नसो...मी कायम तुझ्या सोबत आहे... तुला जपणार आहे", अशी कॅप्शन देते तिने हा व्हिडीओ शेअर केला.

4 / 5

जान्हवीने सुरजच्या घरी जाऊन सर्वांची भेट घेतली, नंतर ती सुरज आणि संजनासोबत मंदिरातही गेली होती. यावेळी संजनाहीसोबत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचं तेज दिसतं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य,नजाकतीने चालणं दिसलं.

5 / 5

संजनाने सैलसर पंजाबी ड्रेस, ओढणी असा पेहराव केला होता, मात्र तरीही व्हिडीओत एका ठिकाणी तिचं बेबी बंप दिसून आलं. असं असलं तरी सुरज चव्हाण किंवा संजना यांच्यापैकी कोणीच या गुड न्युजबद्दल अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. मात्र चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला. जान्हवी तुझं कौतुक आहे, अशीच सुरजच्या पाठिशी रहा, अशा कमेंट्स काही युजर्सनी केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us