‘हनुमान’ फेम अभिनेत्याचा साखरपुडा; कोण आहे होणारी पत्नी?

तेजा सज्जाने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हनुमान' या सुपरहिट चित्रपटामुळे त्याला देशभरात विशेष लोकप्रियता मिळाली.

| Updated on: Nov 17, 2026 | 1:34 PM
1 / 6
Teja Sajja Engagement: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि 'हनुमान' फेम तेजा सज्जा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. तेजाने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत प्रेयसी मौर्यासोबत साखरपुडा केला आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Teja Sajja Engagement: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि 'हनुमान' फेम तेजा सज्जा सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. तेजाने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत प्रेयसी मौर्यासोबत साखरपुडा केला आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 6

विशेष म्हणजे, तेजाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हा साखरपुडा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता टॉलिवूडमधील स्टार्सचा शानदार सोहळा ठरला. तेजा सज्जा आणि मौर्या यांचा साखरपुडा 16 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये पार पडला.

3 / 6

या खासगी सोहळ्यात दोघांनी एकमेकांना अंगठी घालत नव्या आयुष्याची सुरुवात केली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तेजा सज्जाच्या साखरपुड्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

4 / 6

मेगास्टार चिरंजीवी, अभिनेता रवि तेजा, नानी आणि राणा डग्गुबती हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. याशिवाय अल्लू अरविंद, निहारिका कोनिडेला, वरलक्ष्मी सरथकुमार आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून जोडप्याला आशीर्वाद दिले.

5 / 6

तेजा सज्जाने यापूर्वी एका मुलाखतीत आपल्या होणाऱ्या पत्नीविषयी माहिती दिली होती. मौर्या ही अमेरिकेत वाढलेली असून तिचा चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही. तिचं कुटुंब टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित आहे. मौर्या आपल्या वडिलांसोबत याच क्षेत्रात काम करते. चित्रपटसृष्टीतील झगमगाटापासून ती दूर असल्याची गोष्ट आपल्याला विशेष आवडल्याचं तेजाने सांगितलं होतं. या दोघांचा विवाह हा कुटुंबीयांनी ठरवलेला विवाह असल्याची माहितीही त्याने दिली होती.

6 / 6

साखरपुड्यानंतर आता चाहत्यांना तेजा आणि मौर्याच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर इथं दोघांचा डेस्टिनेशन वेडिंग सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर हैदराबादमध्ये जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us