Rekha : रेखाने या प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न तर केलं; पण नवरा म्हणून कधीच स्वीकारलं नाही, कारण…
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या रेखा यांच्या आयुष्यात प्रेम, नातेसंबंध आणि अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या कथित संबंधांपासून ते उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नापर्यंत, रेखा अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याची कहाणी आजही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करते. नेमकी काय कहाणी आहे हे जाणून घ्यायचं आहे असेल तर पुढील माहिती जरूर वाचा.

रेखा यांचा चित्रपट प्रवास सोपा नव्हता. त्यांनी लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कारकिर्दीत यश मिळवूनही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. विशेषतः विनोद मेहरा यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नाच्या चर्चेने बराच काळ लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
२००४ मध्ये अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले होते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्या दोघांचे लग्न झाल्याच्या चर्चांदरम्यान, रेखा यांनी त्यांना पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता.
रेखाने विनोद मेहरा यांना आपल्या आयुष्यातील एक विशेष व्यक्ती म्हणून सांगितले होते मात्र, या नात्याच्या सत्यतेबद्दल सार्वजनिकरित्या अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
विनोद मेहरा यांच्या आई आणि रेखा यांच्या नात्याबद्दलही बरीच चर्चा झाली. यासर उस्मान यांच्या 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात त्या दोघींच्या नात्याबद्दल काही दावे करण्यात आले आहेत.
असंही सांगितलं जातं की, विनोद मेहराची आई रेखाला सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. तथापि, या घटनेच्या तपशिलाबाबत वेगवेगळे अहवाल दिले गेले आहेत.
दुसरीकडे, रेखाचे मुकेश अग्रवालसोबतचे लग्न आणि त्यानंतरच्या घटनांमुळेही तिचे आयुष्य चर्चेत राहिले. आजही रेखाच्या आयुष्याशी संबंधित या कथा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करतात.