Hema Malini: पाकिस्तानी व्यक्तीमुळे झाले हेमा मालिनी यांच्या वडिलांचे निधन, मध्यरात्री नेमकं काय घडलं होतं?

Hema Malini: 70 ते 80च्या दशकात हेमा मालिनी या सुपरस्टार म्हणून ओळखल्या जात होत्या. पण एकदा असे काही झाले की अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले. अनेक वर्ष हेमा मालिनी या त्यांच्या वडिलांच्या मृत्याला स्वत:ला दोष देत होत्या.

| Updated on: Oct 17, 2026 | 1:23 PM
1 / 5
बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी या सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार होत्या. त्यांच्या ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांतील भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठ्या संख्येने आहेत. आजही लाखो चाहत्यांच्या मनात त्या तितक्याच जिवंत आहेत जितक्या एकेकाळी होत्या.

2 / 5

हेमा मालिनी यांचे करिअर उंचीवर असताता एक असाही किस्सा घडला होता, जो त्यांच्या आयुष्यात खोल ठसा उमटवणारा ठरला. १९६८ साली हेमा मालिनी एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देत होत्या आणि त्यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची भुरळ लाखो चाहत्यांना पडली होती. यापैकी एक चाहता पाकिस्तानातून केवळ त्यांची एक झलक पाहण्यासाठी थेट मुंबईत आला होता. तो दररोज त्यांच्या घराबाहेर येऊन बसत असे आणि त्यांना एकदा तरी भेटण्याची आशा बाळगत असे.

3 / 5

बरेच दिवस आणि आठवडे उलटले, तरी त्याला ती संधी मिळाली नाही. एके रात्री तो कसाबसा घरात शिरला. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला पाहताच आरडाओरडा सुरू झाली. घाबरलेल्या त्या माणसाने पोलिसांत देण्याची आणि मारहाण होण्याची भीती वाटून टेबलावर पडलेला चाकू उचलला.

4 / 5

घरातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे हेमा मालिनी यांचे वडील इतके हादरले की त्यांनी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोनपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांना बोलावण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि त्यांचे निधन झाले.

5 / 5

या घटनेनंतर हेमा मालिनी यांना अनेक वर्षे असे वाटत राहिले की जर ती रात्र घडली नसती, तर कदाचित त्यांचे वडील आणखी काही काळ जगले असते. वडिलांच्या निधनाचा त्यांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्या स्वतःलाच त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार मानत राहिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us