Himesh Reshammiya : हिमेश रेशमियाच्या कोट्यवधींच्या पेंटहाऊसमध्ये प्रायव्हेट कॅफे अन् शाही थाट; घरातील प्रत्येक गोष्ट आहे खास

संगीतविश्वातील यशस्वी कारकीर्द आणि वेगळी जीवनशैली यामुळे हिमेश नेहमीच चर्चेत असतो. आता त्याच्या आलिशान पेंटहाऊसची झलक पाहून चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याचीही ओळख झाली आहे.

| Updated on: Oct 20, 2026 | 11:50 AM
1 / 6
बॉलिवूडमध्ये आपल्या हटके आवाजाने आणि संगीताने वेगळी ओळख निर्माण करणारा गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया सध्या 'इंडियन आयडॉल : लेजेंड्स रिटर्न' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, यावेळी त्याच्या गाण्यांपेक्षा त्याच्या आलिशान घराची अधिक चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके आवाजाने आणि संगीताने वेगळी ओळख निर्माण करणारा गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया सध्या 'इंडियन आयडॉल : लेजेंड्स रिटर्न' या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, यावेळी त्याच्या गाण्यांपेक्षा त्याच्या आलिशान घराची अधिक चर्चा रंगली आहे.

2 / 6

मुंबईतील त्याच्या कोट्यवधींच्या पेंटहाऊसमधील खासगी कॅफे, शाही इंटिरियर आणि आकर्षक सजावट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. पत्नी सोनिया कपूरसोबत हिमेश या आलिशान घरात राहतो. त्याच्या घराची झलक समोर आल्यानंतर त्याच्या लाइफस्टाइलची चर्चा सुरू झाली आहे.

3 / 6

दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिने तिच्या कुकिंग व्लॉगमध्ये हिमेश रेशमियाच्या घराला भेट दिली होती. यावेळी त्याच्या घरातील विविध भाग पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. घरात प्रवेश करताच भव्य लिव्हिंग रूम लक्ष वेधून घेते. प्रशस्त जागा, आकर्षक फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूंमुळे या खोलीला राजेशाही लूक मिळाला आहे.

4 / 6

लिव्हिंग रूममध्ये पाहुण्यांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या सेंटर टेबल्सवर फुलांची सजावट करण्यात आली असून, भिंतींवर अँटिक शोपीस आणि आकर्षक कलाकृती दिसतात. खोलीतील एका कोपऱ्यात ठेवलेला लाल रंगाचा मोठा सोफा विशेष लक्ष वेधून घेतो. मोठ्या खिडक्यांमुळे घरात नैसर्गिक प्रकाशही भरपूर येतो.

5 / 6

हिमेशच्या घरातील सर्वांत खास भाग म्हणजे कॅफेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली बैठक व्यवस्था. घरातील किचनची सजावट पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांच्या थीममध्ये करण्यात आली आहे. या जागेत कॅफेसारखं वातावरण तयार करण्यात आलं असून, हिमेश आणि सोनिया इथं निवांत वेळ घालवतात.

6 / 6

हिमेशच्या घरातील हॉलच्या एका बाजूला डायनिंग एरिया तयार करण्यात आला आहे. भिंतींवरील पेंटिंग्स, आकर्षक फर्निचर आणि दोन झुल्यांमुळे घराला वेगळाच लूक मिळाला आहे. या सजावटीतून हिमेश आणि सोनिया यांची इंटेरियरची आवड दिसून येते. घरातील प्रत्येक भागाची रचना करताना आराम आणि सौंदर्य यांचा विचार करण्यात आल्याचं दिसतं. प्रशस्त हॉल, आकर्षक बैठक व्यवस्था आणि सजावटीच्या वस्तूंमुळे हे घर एखाद्या आलिशान हॉटेलसारखं भासतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us