
मंदाना करीमी सोशल मीडियावरील चर्चेचा विषय असते. ती अनेकदा आपले बोल्ड फोटो टाकून चर्चेत येते.

अनेकदा मंदानाला तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. मात्र, तिला याचा काहीही फरक पडला नाही.

मंदाना करीमी बिग बॉसमध्ये आल्यानंतर खूप चर्चेत आली. बिग बॉसच्या दर्शकांमध्ये तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते झाले.

मंदाना आधी एअर होस्टेस होती. नंतर ती मॉडेलिंगमध्ये आली आणि तेथून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

रणबीर कपूरच्या रॉय चित्रपटातून मंदानाने बॉलिवूडमधील कामाला सुरुवात केली.

मंदाना तुषार कपूरसोबत क्या कूल हैं हम 3 मध्ये देखील दिसली.

मात्र, मंदानाला बॉलिवुडमध्ये फार चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही. ती शेवटी 2016 मध्ये क्या कूल हैं हम 3 मध्ये दिसली होती.

मंदाना तुषार शेट्टीला डेट करत असल्याचीही चर्चा होती. मात्र, दोघांनीही ही माहिती खोटी असल्याचं म्हटलं.

मंदाना बिकिनी आणि बोल्ड आऊटफिटमध्ये आपले फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

यानंतर मंदाना स्टार प्लसच्या इश्कबाज या शोमध्ये नँसी मल्होत्रा म्हणून दिसली. आता शेवटी ती वेब सीरीज द कॅसिनोमध्ये पाहायला मिळाली.